पत्रकार बंधुच्या वाढदिवसानिमित्त सुरु केला एक उपक्रम ! एक झाड माझ्या पत्रकार बंधुसाठी- नाना पाटील सर :

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील आवाज जनतेच्या न्युज चॅनेल चे संपादकाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत
पर्यावरण जागर प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष , शैक्षिक आगाज चे राज्य समन्वयक, टिम हिरवांकुर चे जिल्हा अध्यक्ष , हरित भुसावळ स्वच्छ भुसावळ संकल्पना राबविणारे नाना पाटील सर यांनी भुसावळ शहरातील आवाज जनतेचा या न्युज चॅनेल चे संपादक कलिम पायलट यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार बंधुच्या हस्ते एक वृक्ष माझ्या पत्रकार बंधुसाठी ही संकल्पना मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे एक पेड माँ के लिए याच संकल्पनेवर आधारीत एक पेड पत्रकार बंधु के लिए ही संकल्पना सुरु करून विविध पत्रकार बंधु व नागरिकांच्या माध्यमातून 15 झाडे लावण्यात आली यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रेम परदेशी लोकमत चे छायाचित्रकार श्याम गोविंदा ,देशदुतचे मनोहर लोणे सर, संघर्ष माझा न्युज चॅनेल चे संपादक सुनिल आराक, दैनिक महाराष्ट्र सारथी चे नाना पाटील , भाग्यवेद ॲकेडेमी चे संचालक निळे सर, फालक स्पोर्टचे गामोर फालक, मइझी क्वीक सर्विस चे संचालक श्री धांडे व नागरिकांच्या हस्ते ही वृक्षारोपन करण्यात आले .
यावेळी उपस्थित नागरिकांनी व सर्व पत्रकार बंधुनी पत्रकार कलीम पायलट यांना वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देऊन पत्रकार बंधुसाठी एक झाड या उपकमाचे ही उपस्थित पत्रकार बंधुनी व नागरिकांनी कौतुक केले .