संविधानामुळे बहुजन, अल्पसंख्याकांना मानवी चेहरा मिळाला- मुकुंद सपकाळे ; संविधान संमेलन स्वागताध्यक्षपदी डाॅ. करीम सालार

जळगाव : प्रस्थापित समाज व्यवस्थेने बहुजन, वंचित, अल्पसंख्याकाना नाकारलेले माणूसपण, हक्क, अधिकार सर्वार्थाने संविधानानेच मिळवून दिलेे. अर्थात, संविधानामुळेच बहुजन, वंचित आणि अल्पसंख्याकांना मानवी चेहरा मिळाला असे मत संविधान संमेलनाचे संयोजक मुकुंद सपकाळे यांनी व्यक्त केले.
संमेलन आयोजन समितीच्या बैठकीत ते बाेलत हाेते. अध्यक्षस्थानी प्रा. अशोक पवार होते. प्रास्ताविक प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी केले. संविधान संमेलनाची भूमिका डॉ. मिलिंद बागुल यांनी विषद केली. संविधान संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डॉ. करीम सालार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. खलील देशमुख, सुश्मिता भालेराव, यांनी २६ व २७ जुलै रोजी होणाऱ्या संविधान शिबिराच्या संदर्भात उपस्थितांना माहिती दिली. कवी राहुल तायडे यांनी संविधान गीत सादर केले. सूत्रसंचालन बापूराव पानपाटील यांनी तर आभार जगदीश सपकाळे यांनी मानले.

बैठकीला यांची उपस्थिती….
डॉ. एस. एस. राणे, सुरेश चांगरे, निखिल रांजनेकर, अजय बिऱ्हाडे, राजू सोनवणे, चेतन नन्नवरे, मनोहर गाढे, विकास बिऱ्हाडे, विलास सुरवाडे, डी.एच निकुंभे, अॅड राजेश गोयर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती हाेती.