भुसावळ (प्रतिनिधी)
फुलगाव येथील पुष्पलता नगर मधील ओपन स्पेसमध्ये अज्ञात व्यक्तीकडून अनधिकृतपणे गौतम बुद्धांची मूर्ती बसवण्यात आल्याच्या विरोधात ग्रामपंचायत समोर उपोषण १६ जुलै पासुन सुरू केले असून गुरुवारी दुसऱ्या दिवशी भुसावळ गटविकास अधिकारी फुलझडे यांनी या ठिकाणी भेट दिली असून १५ ते २० दिवसाचा कालावधी मागितला परंतु प्रस्तुत पत्रावर गटविकास अधिकारी यांचा व वरिष्ठांचा शिक्का नसल्याने उपोषण सोडण्यास नकार देण्यात आला . उपोषण कर्त्याचे म्हणणे आहे कि सहा महिन्या पासून शासनाने यावर कोणताही तोडगा काढून अतिक्रमण काढण्यात आले नाही तसेच प्रांत अधिकारी यांच्या कडे मिटींग मध्ये आम्हास बोलाविण्यात आले नाही . जोपर्यत
सक्षम अधिकारी आम्हाला अतिक्रमण करून स्थापन केलेली मूर्ती ह विणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही . ग्रामसभेत केलेला ठराव आम्हास मान्य असून शासनाने त्याची अंमलबजावणी करावी व आमच्या हक्काची जागा आम्हास रिकामी करून द्यावी .
या प्रसंगी वरणगांव पोलीस स्टेशन चे एपीआय अमित बागुल , विस्तार अधिकारी वाढे , ग्राम विकास अधिकारी मिना तायडे व सरपंच शाम फुलगावकर उपसरपंच सिद्धांत चौधरी उपस्थीत होते .

.ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की,उपोषणादरम्यान कोणत्याही उपोषणकर्त्याच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल.
उपोषणास बसलेले प्रल्हाद उत्तमराव जाधव,
सौ.सुनिता राजेश मिस्तरी,सुनिता सुतार,
सौ.मेघा संजय पाटील,सौ. सुमन प्रल्हाद जाधव,सौ.सोनी किशोर चौधरी,
संजय शशिकांत पाटील,दगडू झोपे आदींचा सामावेश आहे .


