भुसावळ (प्रतिनिधी )-
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहरातील माजी नगरसेवक संतोष बारसे व नगरसेविका सोनी संतोष बारसे तसेच माजी नगरसेविका कौशल्या बारसे तसेच पहेलवान पूत्र ग्रुपतर्फे प्रभाग क्रमांक नऊमध्ये अन्नदानाचा कार्यक्रम झाला. प्रसंगी बारसे कुटुंबियांतर्फे महामानवास घरीच अभिवादन करण्यात आले. प्रभाग क्रमांक नऊमधील मातोश्री रमाई आंबेडकर नगर, अण्णाभाऊ साठे नगर तसेच गरजू परीवारावांना अन्नदान करण्यात आले. घरोघरी जावून आलूकोबीची भाजी, पुरी तसेच शिर्याचे वाटप करण्यात आले.
नागरीकांना घरीच थांबण्याचे आवाहन
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी सुरू असून आपल्या आरोग्याची सुरक्षिततेसाठी नागरीकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन नगरसेविका सोनी बारसे व माजी नगरसेवक संतोष बारसे यांनी प्रभागातील नागरीकांना केले आहे.



