भुसावळ (प्रतिनिधी ) –
राष्ट्रीय शिक्षा समिती संचलित बियाणी स्कूल भुसावळ येथील विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात उत्कृष्टरित्या पावली खेळत विठ्ठल मंदिरापर्यंत दिंडी विठोबा माऊलीच्या जयघोषात मार्गक्रमण करीत मंदिरापर्यंत उत्साहात पोहोचले.
मातृभूमी चौकात मनोज बियाणी,डॉ.संगीता बियाणी, स्मिता बियाणी,
आयुषी बियाणी,प्रवीण भराडिया,किशोर कोलते,किरण कोलते आदी मान्यवर तसेच शाळेचे मुख्याध्यापक रुद्रसेन गांठिया,शाळेचे सुपरवायझर अलीना मिस आदी मान्यवरांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगाची आरती केली.महिलांनी सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये सहभागी होऊन फुगडी खेळण्याचा आनंद घेतला.
यानंतर विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हा उपक्रम घेतलेला होता.




