जळगाव – येथील सत्यशोधकी साहित्य परिषद जिल्हा शाखा जळगाव यांच्यातर्फे कवयित्री ज्योती वाघ बाविस्कर रचित ओसंडले शब्दकण या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार, दिनांक 29 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजता जळगाव येथील महाबळ रोडलगत असणाऱ्या अभियंता भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. अध्यक्षस्थानी डॉ. मिलिंद बागुल असतील. काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक माया धुप्पड व गझलकार ज्ञानेश पाटील यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विजय पवार, प्रतिमा सानप, डॉ. सत्यजित साळवे, डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, डॉ. जगदीश पाटील, विजय भुयार, संपदा संत, डॉ. प्रमोद पांढरे, युवराज माळी उपस्थित राहणार आहेत. उपस्थितीचे आवाहन गौतम बाविस्कर यांच्यासह सत्यशोधकी साहित्य परिषद जिल्हा शाखा जळगाव यांच्यातर्फे करण्यात आले आहे.



