महिला क्रिडा मंडळ भुसावळ तर्फे मेहंदी स्पर्धा संपन्न…!!

भुसावळ (प्रतिनिधी ) –
महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून महिला मंडळ भुसावळ तर्फे नेहमीच विविध कार्यक्रम राबवले जातात. नुकत्याच मंडळातर्फे राममंदिर सभागृहात मेहंदी स्पर्धा घेण्यात आल्या.
एकुण निरनिराळ्या जतीधर्मांच्या 47 स्पर्धकांनी त्यात भाग घेऊन आपली कला सादर केली. सर्व स्पर्धकांना सहभागी झाल्या बद्दल अतिशय सुंदर सर्टिफिकेट देण्यात आले.
स्पर्धेचा विषय होता “ब्राईडल मेहंदी” व त्यासाठी वेळ अर्धा तास देण्यात आला होता. कमीतकमी वेळात जास्तीत सुंदर मेहंदी काढायची संकल्पना होती.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे अपेक्षा जैन नावाची दिव्यांग मुलगी अपेक्षा जैन हीने जळगावहून येऊन सहभागी होऊन उत्तेजनार्थ बक्षिस पटकावले..
स्पर्धा संपल्यानंतर पुण्याहून आलेल्या श्रुती ओक यांनी बारकाईने परीक्षण करून स्पर्धेचे बक्षिसे काढली.
स्पर्धेच्या सुरवातीला सचिव लता होसकोटे यांनी स्पर्धेचे नियम सांगितले व वेळ काटेकोर पणे बघीतली जाईल असे स्पष्ट केले.
बक्षीस समारंभामधे सर्व प्रथम सुत्रसंचलन जयश्री ओक यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
मनिषा पाटील, चेतना खडसे, वैशाली अनंत पाटील ह्या तीन नविन सदस्यांना महिला क्रिडा मंडळत प्रवेश देऊन गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
महिला क्रिडा मंडळाच्या अध्यक्षा आरती चौधरी यांनी प्रास्ताविकात महिला क्रिडा मंडळ सातत्याने महिलांच्या कलागुणांच्या विकासासाठी झटत असते व महिलांमधे आत्मविश्वास निर्माण करून अर्थार्जनासाठी उद्युक्त केले जाते. मेहंदीचा रंग हा अल्पकाळासाठी आहे पण महिला क्रिडा मंडळाचा आपुलकीचा प्रेमाचा रंग कायम टीकणारा आहे असा विश्वास दिला.
या नंतर बक्षिस समारंभात
प्रथम पारितोषिक- तेजस्वीनी वाणी
द्वितीय- पुजा किशोर भोई
तृतिय- अंकिता नरवाडे
उत्तेजनार्थ-प्रज्ञा पाटील
उत्तेजनार्थ धनश्री कासार नशिराबाद
या व्यतिरिक्त बक्षिसे.. उत्तम सादरीकरणासाठी..
चारूल भंगाळे
पुजा तायडे
दामिनी वाणी
महेक बानो खान
श्वेता कामरानी
रूक्खसार शेख
भाग्यश्री मोरे
मेघा माळी
अपेक्षा जैन
दिपमाला रील
यांना उत्कृष्ट कले साठी भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रो. चेअरमन कावेरी चौधरी यांनी मंडळा तर्फे आभार मानले.
स्वाती भोळे यांनी या स्पर्धांसाठी परीश्रम घेतले.
या प्रसंगी मंडळाच्या सदस्या प्रभा पाटील, विनीता नेवे, प्राची राणे, मंगला पाटील, चारू पाटील, अनिता कवडीवाले, भारती चव्हाण, वैशाली पाटील, विजया निकम,साधना सराफ सराफ, संगीता पाटील हजर होते.
तसेच आमंत्रित पाहुण्या मेघा कुरकुरे, मंगला कोलते, मनिषा निकम, योगी ता पाटील व ज्योती पाटील ह्यांची विशेष उपस्थिती होती