आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्त ऑर्डिनेंस फॅक्टरी भुसावळ मध्ये विविध कार्यक्रम;

भुसावळ (प्रतिनिधी ) –
21 जून 2025 ऑर्डिनेंस फॅक्टरी भुसावळ येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस आयोजित करण्यात आला . योग दिवसाचे औचित्य साधून ,योगाचे महत्व व त्याचा व्यापक प्रचार प्रसार आणि योगा बद्दल जनसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि योगाला दैनंदिन जीवनात सामील करून घेणे, यो उद्देशाने 19 जून 2025 रोजी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मुलांसाठी सीनियर क्लब येथे दुपारी
3 वाजता, योगाचे महत्व या विषयावर, चित्रकला स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते , त्या मध्ये मोठ्या संख्येने मुला, मुलींनी सहभाग नोंदविला.
20 जून 2025 या दिवशी दुपारी 3:30 वाजता ,
योग एक जीवन शैली, या विषयावर व्याख्यान ठेवण्यात आले होते,
त्या बरोबर,
प्रत्येक घराच्या अंगणामध्ये योग अंतर्गत,
सकाळी सहा ते सात व काहींनी संध्याकाळी चार ते सहा च्या दरम्यान योग अभ्यास केला.
21 जून 2025 रोजी सामूहिक योग अभ्यास, सकाळी सहा ते सात मध्ये आयोजित केला गेला.
कार्यक्रमाची सुरुवात ओम च्या प्रतिमेला माल्यार्पण करून व दीपप्रज्वलित करून , माननीय श्री निरंजन लाल कार्यकारी निदेशक, ऑर्डिनेंस फॅक्टरी भुसावळ व श्रीमती शोभना शर्मा ,
यंत्र महिला कल्याण समिती अध्यक्षा भुसावळ शाखा. यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सोबत , महाप्रबंधक माननीय, श्री.प्रकाशकुमार काजी व सर्व अधिकाऱ्यांनी दीप प्रज्वलन केले.
यावेळी ऑर्डिनेंस फॅक्टरी भुसावळ चे कार्यकारी निदेशक
माननीय श्री निरंजन लाल यांनी आपले विचार मांडताना म्हणाले फैक्ट्री, मधील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व त्यांचे परिवारातील सदस्यांनी योगाचे महत्त्व समजून प्रत्येक दिवशी योग करायला पाहिजे .
आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, बॅलेंसिंग पावर वाढवणे, यावर विशेष लक्ष केंद्रित केले पाहिजे ,
योगा प्रति जागरूकता आणि प्रचार, प्रसार करणे ही प्रत्येक माणसाची जिम्मेदारी आहे असे ते म्हणाले.
यावेळी सूत्रसंचालन सुभाष पाटील जे.डब्ल्यू.एम.यांनी केले .
योग अभ्यास योग प्रशिक्षक मधुकर.एस.राऊत यांनी करुण घेतला कार्यक्रमांमध्ये ऑर्डिनेंस फॅक्टरी चे सर्व अधिकारी कर्मचारी बंधू भगिनी व सर्व युनियन असोसिएशनचे पदाधिकारी जे.सी.एम.चे मेंबर,
कार्य समिती सदस्य उपस्थित होते