एक पृथ्वी एक आरोग्यासाठी करूया योग ! 21 जून योग दिना निमित्त ब्रम्हाकुमारी सेवा केंद्रात उपक्रम ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –
येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र भुसावळ या ठिकाणी 21 जून योग दिनाच्या निमित्ताने एक पृथ्वी एक आरोग्य चला करूया योग !चे आयोजन करण्यात आले आहे .
या योग दिनाच्या निमित्ताने सेवा केंद्रातील जवळपास 200 साधक त्यासोबत इतर नागरिक ही या योगाभ्यासाला येऊ शकतात आपले मन व आपल्या आरोग्य हे जर सुदृढ असतील तर आपण कोणते कार्य सहजपणे करू शकतो शारीरिक योगा सोबतच राजयोग ध्यान हे सुद्धा शरीराला आवश्यक आहे सेवा केंद्र मध्ये नेहमी सराव केला जात असतो . या योगाभ्यासात सूक्ष्म व्यायाम, प्राणायाम ,योगा, ध्यान ,तसेच संगीतावर आधारित योगा कवायत करण्यात येणार आहे सेवाकेंद्राच्या बीके ज्योती बहन बीके कविता बहन योगशिक्षक तथा पर्यावरण मित्र नाना पाटील सर राहणार आहेत . या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ . किशोर मोरे उपस्थित राहणार आहेत .
दि 21 जून रोजी हा योगा वर्ग सकाळी 6.00 ते 7.00 पर्यंत राहणार आहे . तरी नागरीकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन सेवाकेंद्राचा संचालिका बी के सिंधू दिदी यांनी केले आहे .
या योगाभ्यासाचे ठिकाण डॉ . बाबासाहेब आंबेडकर मैदानाच्या बाजूला ,हॉटेल ग्रीन लीफ च्या मागील बाजू यावल रोड भुसावळ या ठिकाणी होणार आहे