भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता संपूर्ण भारतात लॉकडाउन सुरुं आहे.या पार्श्वभूमीवर आजाराची सध्याची परिस्थिती लक्षात घेता १४ एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नेहमीप्रमाणे एकत्र येऊन साजरी न करता आपल्या घरीच साजरी करण्याचे आवाहन प्रशासन,पोलीस व आंबेडकरी चळवळीतील मान्यवर अनुयायींना केले होते.त्यांच्या आवाहनाला राजकारणातील दिग्गज व अनुयायींनी प्रतिसाद देवून त्याचे पालन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी आज मंगळवार १४ एप्रिल रोजी ११ वाजता तालुक्याचे आ.संजय सावकारे व माजी सभापती राजु सूर्यवंशी यांनी कुटुंबियांसह घरीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या प्रतिमांना वंदन केले तसेच यावेळी कोरोना व्हायरसपासुन या विश्वाला मुक्त करावे अशी प्रार्थना केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सागितले होते की, मी प्रथम व अंतिम देखील भारतीय आहे तेच मनात धरुन आपल्यांना सामंजस्यपणा दाखवायचा आहे. येत्या ३ मे पर्यंत लाॅकडाऊन वाढले असून आपल्या देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटाचा सामना आपण सर्वांनी मिळून करावयाचा आहे संकल्प करून
सोशल डिस्टनसिंगचे पालन करा व घरात रहा असे आवाहन केले .
आंबेडकर चौकाला छावणीचे स्वरूप ;शहरात सर्वत्र शुकशुकाट ;
शहरात सर्वत्र धुमधड़ाक्यात उल्हासात साजरी होणारी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती आज मात्र अत्यंत साधेपणाने घरच्या घरीच सर्व भीमसैनिक व अणुयायी यांनी साजरी केली .
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बाबासाहेब यांचे पुतळयाचे दर्शनाकरीता आदल्या दिवशी रात्री पासुनच गर्दी उसळते . मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने या चौकात बंदोबस्ताला असलेले पोलिसांचा फ़ौजफाटा दिसून आल्याने छावणी चे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून आले. सर्व भीमसैनिक यांनी घरातच राहून सामंजस्यपणाने देशहिताकरीता घेतलेला निर्णयाचे सर्वानी कौतुक केले आहे .



