भुसावळ (प्रतिनिधी ) –
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व कोरोनाच्या पाश्वभुमीवर दि.१४ एप्रिल मंगळवार रोजी अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके यांनी भेट देत पोलीस पथकासह डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते रजा टाॅवर चौक पथसंचलन करुन शक्ती प्रदर्शन केले.दरम्यान गौसीया नगरात नागरिकांनी पोलीसांवर फुलांची उधळण करून स्वागत केले .
रुटमार्च मध्ये अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके,उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,बाजारपेठचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत,शहरचे बाबासाहेब ठोंबे,तालुक्याचे रामकृष्ण कुंभार आदी उपस्थित होते.
यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके म्हणाल्या कि,कोरोना आजाराने जगभरात हाहाकार माजविला असतांना जळगाव जिल्ह्यातील नागरिक लाॅकडाऊन काळात जागरुक राहील्याने जिल्हा कोरोनाच्या आजारापासून दुर राहीला आहे .आगामी ३ मे पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाॅकडाऊन वाढविला असून कोरोनाचा सामना करण्यासाठी मागच्या लाॅकडाऊन पेक्षा जास्त काळजी घेण्याचे आवाहनही यावेळी केले .
दरम्यान गौसीया नगरात पोलीसांवर फुलांची उधळण
देशभरात कोरोनापासून नागरिकांना वाचवण्यासाठी पोलीस प्रशासन दिवसरात्र सज्ज असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत व पथकातील अधिकारी,कर्मचारी, आरसीपी प्लाटूनचे कर्मचारी यांनी भारत सरकारने घेतलेल्या लोकडाऊनच्या निर्णया दरम्यान २१ मार्च ते १४ एप्रिल पर्यंत नागरिकांची रक्षा केली तसेच यापुढेही करीत आहे याकरीता गौसिया नगर भागातील यंग ग्रुप तर्फे फुलांची उधळण करून प्रोत्साहन वाढवून मानवंदना देवून स्वागत करण्यात आले.तसेच आगामी लाॅकडाऊन सुध्दा यशस्वी करण्याचे आश्वासन पोलीसांना दिले.यावेळी यंग ग्रुपचे मुक्तार मन्यार,मुस्तफा खाटीक, आबिद पिंजारी, जहांगीर मन्यार, वसीम शेख,अाबिद पिंजारी, बिलाल शहा,रफिक शेख,अजिज शेख,रोशन पिंजारी,आसिफ खान,मुक्तार पटेल,इमरान शेख, जफर खान,सईद पटेल,अल्ताफ शेख,अकील शेख,इमरान मन्यार व गौसिया नगर भागातील नागरिक डिस्टन्स पाळून उपस्थित होते.


