मिशन “सहयोग – २०२५” अंतर्गत भुसावळ विभागात अनुकंपा द्वारे २० उमेदवारांना नेमणूक पत्र प्रदान

भुसावळ (प्रतिनिधी ) – दिनांक १८ जून २०२५ रोजी, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात “मिशन सहयोग – २०२५” या उपक्रमाअंतर्गत विभागीय कार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात अनुकंपा अंतर्गत पात्र ठरलेल्या एकूण २० उमेदवारांना नेमणूक पत्र प्रदान करण्यात आले. या नेमणुकीत १३ ग्रुप ‘क’ व ७ ग्रुप ‘ड’ संवर्गातील पदांचा समावेश होता.

या अगोदरच भुसावळ विभागात “मिशन सहयोग – २०२५” उपक्रमांतर्गत २८ उमेदवारांना यशस्वीरित्या नेमणूक देण्यात आलेली आहे, आणि आजच्या नियुक्तीसह हा आकडा ४८ वर पोहोचला आहे.

या कार्यक्रमावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इती पांडे, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रशासन श्री सुनील कुमार सुमन, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) श्री एम के मीना आणि वरिष्ठ शाखा अधिकारी उपस्थित होते. त्यांनी नविन नेमणूकधारकांचे स्वागत करत त्यांना कार्यक्षेत्रात प्रामाणिकपणे योगदान देण्याचे आवाहन केले.