. भुसावळ (प्रतिनिधी: शहरातील गायत्री नगर परिसरातीलडिस्को म्युझिक सेंटरच्या गोदामात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करून सुमारे 35 लाख रुपये किंमतीचे टीव्ही, एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन लांबवण्यात आले. रविवारी रात्री ही चोरी झाली. या चोरीने परिसरातील व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. गोदामाच्या शेजारील सीसीटीव्ही कॅमेर्यात चोरट्यांची हालचाल कैद झाली असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत
भुसावळ शहरातील गायत्री नगरात नंदलाल मिलकीराम मकडीया (62, रा.श्रीहरी नगर, भुसावळ) यांचे फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, एलईडी टीव्हीचे गोडावून आहे. रविवार, 15 जून रोजी सायंकाळी 6 वाजता ते सोमवारी 16 जून रोजी सकाळी आठ वाजेच्या पूर्वी बंद गोदामातून अज्ञात चोरट्यांनी फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, एलईडी टीव्ही असा एकूण 35 लाखांचा मुद्देमाल लांबवला. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर नंदलाल मकडीया यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ करीत आहे.



