भुसावळ (प्रतिनिधी ) – विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, भुसावळ येथे दिनांक १७ जून २०२५ रोजी मंडळ राजभाषा कार्यान्वयन समिती ची १५५ वी बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक ३१ मार्च २०२५ रोजी समाप्त झालेल्या तिमाहीतील कार्यांची समीक्षा करण्यासाठी घेण्यात आली होती.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अपर मंडळ रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) . सुनील कुमार सुमन होते. यावेळी अपर मंडळ रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) . मुकेश कुमार मीणा, सर्व वरिष्ठ विभागीय अधिकारी तसेच विभागीय राजभाषा अधिकारी उपस्थित होते.
बैठकीची सुरुवात राष्ट्रभाषा हिंदीचे महत्त्व आणि राजभाषा अधिनियमाच्या अनुपालनाबाबत संकल्पाने करण्यात आली. राजभाषा सचिवांनी मागील तिमाहीत झालेल्या उपलब्धी, दिलेले मार्गदर्शक निर्देश तसेच विविध कार्यालयांनी केलेल्या प्रयत्नांची सविस्तर माहिती सादर केली.
बैठकीत राजभाषा सचिवांनी सर्व सहभागी सदस्यांचे आभार मानले आणि आगामी तिमाहीसाठी निश्चित करण्यात आलेल्या उद्दिष्टांची माहिती दिली. बैठक सकारात्मक वातावरणात आणि राजभाषा कार्यान्वयनाबाबत नवचैतन्य व दृढ संकल्पाने संपन्न झाली.


