भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे भुसावळ विभागातर्फे दहावी बारावीतील ३०० मुलामुलींचा भव्य सत्कार ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे विभाग भुसावळ तर्फे . १०, व १२ वी मध्ये ८०%च्या पुढे मार्क असलेल्या ३०० मुलामुलींचा सत्कार खाचणे हॉल, भुसावळ येथे संपन्न झाला.
या प्रसंगी अध्यक्ष स्थानी कुटुंबनायक ललित दादा पाटील उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे वस्त्रोद्योग मंत्री व आमदार संजय सावकारे तसेच स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजचे दिपक चौधरी हजर होते.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी अहमदाबाद दुर्घटनेतील मृतांच्या श्रध्दांजली देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुणे म्हणून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रस्तावना भोरगांव लेवा पंचायत भुसावळचे विभाग प्रमुख सुहास चौधरी यांनी केली.यात त्यांनी सांगितले की, समाजातील मुलामुलींना अधिकाधिक प्रोत्साहन मिळावे, ज्या मुळे त्यांनी त्यांच्या पुढील आयुष्यात असेच यश संपादन करावे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट केले.
भुसावळचे आमदार व मंत्री संजय सावकारे आहे यांनी आपल्या भाषणात सांगितले की भुसावळ विभागातर्फे भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखे तर्फे समाजोपयोगी विविध उपक्रम घेतले जातात. यासाठी हक्काची जागा नसल्याने त्यांना प्रत्येक वेळेस कार्यक्रम घेताना जागेचा प्रश्न निर्माण होतो. यासाठी शासना तर्फे भोर लेवा पंचायतीच्या भुसावळ शाखेला जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले. त्यांच्या हस्ते काही मुला मुलींचा सत्कार करण्यात आला. त्या नंतर भोरगाव लेवा पंचायत च्या संचालिका व सामुपदेशीका आरती चौधरी यांनी मुलांना व पालकांना मार्गदर्शन केले.
त्यात त्यांनी मुलामुलींसाठी विवीध संधी उपलब्ध आहेत त्या सांगून , त्याचा फायदा घ्या, व फक्त मेहनतीनेच यश मिळते. असे सांगितले.
प्रमुख पाहुणे दिपक चौधरी सुध्दा यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की अभ्यासात सातत्य असायला हवे. तरच यश मिळते.
आभार प्रदर्शन सुभाष भंगाळे यांनी केले.
या प्रसंगी भोरगांव भुसावळ विभागाचे संचालक आर.जी.चौधरी,महेश फालक, मंगला पाटील, कावेरी चौधरी, शरद फेगडे, अनिल वारके, परिक्षित ब-हाटे, अनिल वारके, चेतन पाटील, संजय पाटील, संध्या वराडे, अजय पाटील उपस्थित होते.
या प्रसंगी कौशल प्रमोद पाटील एम. पी. एस. सी. परीक्षेतुन उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणून झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.
अर्थव दिपक महाजन या विद्यार्थ्यांने आय. आय. टी. परिक्षेत ९९.९३ मार्क मिळाल्या बद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
ज्ञानज्योती महाविद्यालय खडके ची दहावी ची विद्यार्थीनी धनश्री चौधरी हीने भावना व्यक्त केल्या व भोरगांव पंचायतीच्या संचालकांचे आभार मानले.
भोरगांव तर्फे ३०० विद्यार्थी विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. त्यात शाळेत पहिले आलेल्या अन्य समाजाच्या मुलामुलींचा सुध्दा समावेश आहे.
भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेच्या महिला विभागाच्या दिपाली ब-हाटे, प्राची राणे, सुनीता पाचपांडे, मनिषा चौधरी, मीनाक्षी धांडे, वैशाली महाजन,संध्या भोळे हजर होत्या तसंच भोरगाव लेवा युवा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच समाजातील वरिष्ठ मामा पाचपांडे अरुण घनश्याम पाटील, सुरेश हंबर्डीकर, किरण महाजन, प्रमोद नेमाडे, प्रविण पाटील, दिनेश भंगाळे, निलेश भोळे यांची सुद्धा उपस्थिती होती. तसेच प्रवीण पाटील, निळकंठ भारंबे, उल्हास महाजन गोलू महाजन, प्रशांत पाटील,उपस्थित होते. विनीत हंबर्डिकर, अशोक कोळी, नितीन ब-हाटे, यांनी सहकार्य केले
शिक्षकवृंद निलकमल भोळे, सुनिल देशमुख, पंढरीनाथ लोहार यांनी मदत केली.
या प्रसंगी पाल्य पालक व समाजातील प्रतिष्ठित नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
ज्या विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट व शिल्ड राहिले असेल त्यांनी नंतर भोरगावच्या आँफीस मधून घेऊन जाण्याचे आवाहन संचालकांनी केले आहे.