जळगावात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या :

जळगाव – अंबेरी, ता. नेपानगर, मध्यप्रदेश येथील रहिवासी जळगाव येथे कंपनीत कामास असलेल्या विवाहित युकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली .

जळगाव येथे कंपनीत कामास असलेला अजय बुधराम पाटील (वय २२, रा. अंबेरी, ता. नेपानगर, मध्यप्रदेश ) हा ड्युटी आटोपल्यानंतर घरी आला . या युवकाने पत्नीसोबत जेवण केले. त्यानंतर झोपलेल्या अजय पाटील (या तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना एमआयडीसी परिसरात रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,मध्यप्रदेशातील अंबेरी गावात राहणारा अजय पाटील हा रोजगारासाठी जळगावात आला होता. एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरी करुन तो कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होता. रात्री कंपनीतून घरी आल्यानंतर पत्नीसोबत जेवण करून, अजय काही वेळासाठी झोपला. या दरम्यान, अजयच्या पत्नीने घरातील आवर-सावर करुन अजय झोपलेल्या खोलीत गेली. खोलीचा दरवाजा उघडताच समोर पती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. पत्नीने हंबरडा फोडताच परिसरातील व कंपनीतील काही जणांनी अजयला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासून अजयला मृत घोषीत केले.
अजयचे सहा महिन्यांपुर्वीच लग्न झाले होते. तसेच काही एक-दोन महिन्यांपुर्वीच अजय आपल्या पत्नीला घेऊन, या ठिकाणी काम करत होता. त्याने आत्महत्ये सारखा टोकाचा निर्णय घेतल्याने त्याच्या पत्नीला मानसिक धक्का बसला आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.