भुसावळात ताप्ती पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वाहिली श्रद्धांजली ; तर जखमींसाठी केली सामूहिक प्रार्थना.

भुसावळ (प्रतिनिधी )- अहमदाबादहून लंडनसाठी जाणारे एअर इंडियाचे विमान गुरुवारी उड्डान घेतल्यावर दोन मिनिटांमध्ये कोसळले. त्यात २६५ प्रवासी ठार झाले. व हे विमान अहमदाबाद जवळच्या मेघानी नगर परिसरातील सिव्हिल रुग्णालय आणि बीजे मेडिकल कॉलेजच्या व नर्सिंग कर्मचाऱ्यांच्या निवासी क्वॉटर्स जवळ कोसळले. या दुर्घटनेत एमबीबीएस चे विद्यार्थी,तेथील एक निवासी डॉक्टर ,एक सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांची पत्नी मृत्यूमुखी पडली असून ६० वर अधिक वैद्यकीय विद्यार्थी जखमी झाले.

त्यात ठार झालेल्यांना ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कुल च्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी शाळेत श्रद्धांजली वाहिली. तसेच जे जखमी झाले आहेत त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी यासाठी शाळेत सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल नीना कटलर,व्हाईस प्रिन्सिपल मंनप्रीत कौर,श्रध्दाली घुले,गौरी प्रभू देसाई ,गायत्री घीर्णीकर, सोफिया पीबॉडी,पंकज राठोड व विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो कॅप्शन – भुसावळातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहताना प्रिंसीपल निना कटलर, सोबत श्रध्दाली घुले ,मनप्रीत कौर व विद्यार्थी.