कोयता, तलवार हातात घेऊन दहशत पसरविणाऱ्यास एसीबीच्या पथकाने केली अटक –

जळगाव : शहरासह जिल्ह्यात घातक हत्यारं बाळगून दहशत माजविण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांकडून करण्यात येत आहे. आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर समाजकंटकांकडून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे.

यानुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बोदवड येथे तलवार आणि कोयता बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या एकाला अटक केली आहे. बोदवड तालुक्यात एक व्यक्ती दहशत पसरवीत होता. ही व्यक्ती बोदवड ते शेलवड आणि महालक्ष्मी माता मंदिर, तपोवनकडे जाणाऱ्या रस्त्यावर हातात तलवार व कोयता घेऊन दहशत निर्माण करीत होता. याची खबर मिळताच पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख यांनी ही बाब तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळवली.

यानुसार संदीप पाटील यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या. बोदवड तालुक्यात एक व्यक्ती दहशत पसरवीत होता. ही व्यक्ती बोदवड ते शेलवड आणि महालक्ष्मी माता मंदिर, तपोवनकडे जाणाऱ्या रस्त्यावर हातात तलवार व कोयता घेऊन दहशत निर्माण करीत होता. याची खबर मिळताच पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख यांनी ही बाब तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळवली. यानुसार संदीप पाटील यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या.