मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीना यांनी भुसावळ विभागाची केली पाहमी ;


भुसावळ (प्रतिनिधी ) –

दिनांक ०६.०६.२०२५ रोजी भुसावळ रनिंग रूम येथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री धरमवीर मीना, प्रधान मुख्य परिचालन प्रबंधक श्री श्याम सुंदर गुप्ता आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांच्या हस्ते ‘सिग्नल लोकेशन गाईड’, ‘क्रू डायरी’ व ‘मालगाडी थांबणे टाळण्यासाठी मार्गदर्शक सूचना’ हे पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या उपक्रमामुळे रेल्वेची कार्यक्षमता, वेळपालन, सुरक्षितता आणि रेल्वे संचालन अधिक सुलभ व प्रभावी होणार आहे.

महाव्यवस्थापकांनी भुसावळ रनिंग रूमची तपासणी करण्यात आली. रनिंग स्टाफसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांचा आढावा घेण्यात आला आणि कर्मचार्‍यांशी संवाद साधण्यात आला. स्वच्छ, आरामदायक आणि नीटनेटकी विश्रांतीसाठी आवश्यक सुविधा सुनिश्चित करण्यावर भर देण्यात आला.

महाव्यवस्थापकांनी भुसावळ रनिंग रूमची सखोल तपासणी करून लोको पायलट व सहाय्यक लोको पायलट यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी, अभिप्राय व कामकाजाच्या अटींबाबत माहिती घेतली. तसेच त्यांनी वृक्षरोपण केले.

महाव्यवस्थापकांनी भुसावळ स्थानकावर स्काउट गाईड्स यांनी सादर केलेल्या प्रभावी नुक्कड नाटक आणि रेल्वे शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या फ्लॅश मॉबचा अनुभव घेतला — दोन्हीही सादरीकरणे पर्यावरण संरक्षण या विषयावर आधारित होती.

महाव्यवस्थापकांनी भुसावळ-मनमाड विभागाचा विंडो ट्रेलिंग निरीक्षण दौरा केला. या निरीक्षणादरम्यान विभागातील विविध महत्त्वाच्या बाबींचा आढावा घेण्यात आला. निरीक्षणात रेल्वे रुळांच्या फिटनेसची तपासणी, सुरू असलेल्या कामांचा आढावा, स्थानकांची स्वच्छता व व्यवस्थापन, ओव्हरहेड इलेक्ट्रीक (ओएचई) वायरची स्थिती, लेव्हल क्रॉसिंगची सुरक्षा व्यवस्था आणि इतर महत्त्वाच्या सुरक्षाविषयक घटकांचा सखोल आढावा घेण्यात आला.

यावेळी अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) श्री सुनील कुमार सुमन, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक ( तांत्रीक) श्री एम के मीना, वरिष्ठ शाखा अधिकारी आणि इतर अधिकारी, कर्मचारी या निरीक्षण दरम्यान उपस्थित होते.