तालुका पोलिसांची शिवपूर कन्हाळ्यात गावठी दारू अड्ड्यावर धाड; दोघांविरुद्ध गुन्हा :

भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील शिवपूर कन्हाळा येथे तालुका पोलिसांचे सतत धाडसत्र सुरुं आहे .यानुसार शनिवार ११ रोजी पुन्हा दोन ठिकाणी धाड टाकून कारवाई केली आहे .
तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील शिवपूर कन्हाळा गावांत गवळी वाड्यात सार्वजनिक जागी झाडी झुडपात 11.45 वाजेचे सुमारास संशयीत आरोपी खलील हसन गवळी रा.कन्हाळा हा गुळ महू नवसागर गूळ मिश्रीत रसायन बाळगतांना 09 ड्रम मध्ये 1800 लिटर, आणि गावठी हातभट्टीची 25 लिटर तयार दारू असे अंदाजे किंमत 60, 750 रुपयांच्या मालासह मिळुन आला.म्हणून गुन्हा दाखल केला .
तसेच दुसऱ्या गुन्हयात
शिवपूर कन्हाळा शिवारात येथे धांडे यांच्या शेता जवळील नाल्या जवळ सार्वजनिक जागेत दुपारी 5 . 45 वा. संशयीत आरोपी जुम्मा पिरू गवळी हा जळत्या चालु भट्टीवर दारू तयार करत असताना व त्याच्या ताब्यात गुळ, महू, नवसागर मिश्रीत कच्चे व गरम रसायनचे 05 ड्रम मध्ये 900 लिटर रसायन व गावठी हात भट्टीची 30 लिटर तयार दारू अशी अंदाज़े किंमत 32,200 रुपये किंमतीचा माला मिळून आला. छाप्यात एकुण 14 ड्रमात 2300 लीटर रसायन व गावठी हातभट्टीची दारूसह एकूण 92,950/-किंमतीचा माल मिळुन आल्याने त्यांचे विरुद्ध प्रोव्ही कायदा प्रमाणे आणि जारी केलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून भादवि कलम 270 ,188 अन्वये असे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आ़ले आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांचा मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार , पोहेकॉ अजय माळी, पोहेकॉ प्रवीण पाटील, पो हे कॉ विठ्ठल फुसे, पोहेकॉ युनूस ईब्राहिम होमगार्ड भूषण पाटील, यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *