भुसावळ (प्रतिनिधी ) – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सक्षम नारी फाउंडेशन तर्फे 5 जून 2025 रोजी पर्यावरण जागृतीसाठी एक अभिनव कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या निमित्त प्लॅस्टिक वापर न करण्याचा तसेच पर्यावरण वृद्धीसाठी वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला . यावेळी कापडी पिशवी वाटप करण्यात येऊन पत्रक वाटून जनजागृती करण्यात आली . तसेच प्लॅस्टिक वापर करणाऱ्या वर कारवाई व्हावी मागणी पालिकेला करण्यात येऊन निवेदन देण्यात आले .

सक्षम नारी फाउंडेशनच्या सदस्यांनी जुन्या साड्यांच्या कापडी पिशव्या शिवून घेतल्या. मार्केट च्या ठिकाणी कित्येक ग्राहक प्लास्टीक च्या पिशव्या घेऊन जात होते. एक प्लास्टिक च्या पिशवीचे विघटन होण्यास १४ ० ० ० वर्षे लागतात. तसेच त्यामुळे पाण्याचे साठे तुंबून जातात. जैविक सृष्टीचा ऱ्हास होतो. जमिन नापीक होते.व प्लास्टीक जाळल्यास हवेत प्रदुषण होऊन श्वासाचे विकार जडतात किंवा कॅन्सरही होऊ शकतो. याबद्दल पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. तसेच ज्यांच्याकडे प्लास्टिक पिशव्या आहेत त्यांना मोफत कापडी पिशव्या वाटून प्लास्टीक चा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले. याचबरोबर पर्यावरण वृद्धीसाठी सक्षम नारी फाउंडेशनच्या प्रत्येक सदस्यांनी एकतरी झाड लावून ते वाढविण्याचा संकल्प केला.

सरतेशेवटी नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन रस्त्यावरील कचर्याचे ढिग हलवण्यासंबंधी तसेच प्लास्टिक वापर करणाऱ्या विक्रेत्याविरुद्ध कडक कारवाई करण्याबाबत निवेदन दिले . जर प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण संवर्धनाचा निर्णय घेतला व तशी कृती केली तर आपण आपले शहर, आपले राज्य, आपला देश आणि पर्यायाने आपल्या पृथ्वीला सुंदर आणि प्रदुषण मुक्त करू शकतो . .

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सक्षम नारी फाउंडेशनच्या डॉ सुवर्णा गाडेकर,.संगिता जगताप, सुनिता जोशी ,पारूल वर्मा, शीतल मोरे, गायत्री विसपुते, शीतल भालेराव, वंदना हंस, योगिता ठाकूर, दिपा जवरे यांनी योगदान दिले.


