भुसावळ ( सा वा ) –
५ जून – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भुसावळ नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा केंद्रात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात श.राजेंद्र फातले मुख्याधिकारी यांच्या हस्ते तसेच नगरपरिषदेच्या विविध विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष सौ. लक्ष्मी मकासरे, सौ. सविता मकासरे, उपमुख्याधिकारी शेख परवेज अहमद, प्रशासकीय अधिकारी अजित भट, दीपक अहिरे, डॉक्टर संदीप जैन, आस्थापना प्रमुख वैभव पवार, आरेखक महेश चौधरी, रचना सहाय्यक अंकुश गोसावी, रमेश गुंजाळ, धनराज बाविस्कर, संजय भिरूड, राजू कोळी आणि भुसावळ नगरपरिषदेचे ब्रँड अँबेसिडर नाना पाटील सर उपस्थित होते.
*पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वृक्षारोपण हा महत्त्वपूर्ण उपक्रम असून नागरिकांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी यांनी यावेळी केले


