मालेगाव येथे पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या ;

मालेगाव –
येथील पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांचे रीडर पोलिस उपनिरीक्षक अझहर शेख यांनी स्वतः च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हर ने गोळी झाडून आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (शनिवार) दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास पोलिस उपनिरीक्षक अझहर शेख यांनी पोलिस नियंत्रण कक्ष परीसरात स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केली. सदर घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकले नसून ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग घटना स्थळी दाखल झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *