भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ शहरातील पीओएच कॉलनी परिसरातील निलेश अरुण खांडवे (38) या तरुणाने राहत्या घरात पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवार, 1 जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

भुसावळ शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रविवारी दुपारी निलेशचा मोठा भाऊ मंगेश कामावरुन घरी परतल्यानंतर त्याने निलेशच्या खोलीचा दरवाजा ठोठावला मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने खिडकीतून आत डोकावले असता निलेशने छताच्या पंख्याला गळफास घेतल्याचे दिसून आले.
याप्रकरणी शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.


