तळवेल – जीवनोन्नती महिला प्रभाग संघ संस्था हतनुर-तळवेल प्रभाग यांच्या वार्षिक सर्व साधारण सभा (AGM) कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित…

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती भुसावळ अंतर्गत जीवनोन्नती महिला प्रभाग संघ संस्था हतनुर-तळवेल प्रभाग, ता. भुसावळ, जि. जळगांव यांच्यामार्फत वार्षिक सर्व साधारण सभा (AGM) चे पिंप्रीसेकम (भुसावळ) येथे आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजयजी सावकारे व प्रतिष्ठा महिला मंडळ अध्यक्षा सौ.रजनी संजय सावकारे ह्या प्रमुख उपस्थितीत होत्या.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचे हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले यावेळी उपस्थित महिलांना मा रक्षाताई खडसे वस्त्रोद्योग मंत्री ना सावकारे यांनी मार्गदर्शन केले.



