अँड सीमा एन पाटील यांची नोटरी पब्लिक पदी नियुक्ती.


जळगाव – जळगाव जिल्हा सत्र व कौटुंबिक न्यायालयात वकिली म्हणून कामकाज करीत असलेल्या सौ. सीमा एन पाटील (जाधव) यांची भारत सरकारच्या नोटरी पब्लिक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सौ सीमा पाटील (जाधव) यांचे परिवारातील सदस्यही वकीली क्षेत्रात कार्यरत आहे. सौ .सीमा पाटील वकिली करून नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था, रेड स्वास्तिक, निसर्ग आणि पर्यावरण संस्थेत व सामाजिक कार्यात सुद्धा सक्रिय आहे. नोटरी पदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्व स्थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे .