भुसावळात दुर्गावाहिनीच्यावतीने मुलींसाठी स्वरक्षणासाठी लाठी काठी प्रशिक्षण शिबीर;

भुसावळ (प्रतिनिधी ) – महिलांवरील वाढते अन्याय व अत्याचार लक्षात घेता मुलींना स्वरक्षणासाठी लाठी काठी चालवता आली पाहिजे स्वतः स्वतः चे रक्षण केले पाहिजे यासाठी दुर्गावाहिनीच्यावतीने मुलींसाठी स्वरक्षणासाठी लाठी काठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन 15 मे ते 25 मे 2025 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे . या शिबीरास . पु. स. गु. महामंडेलेश्वर जनार्दन हरिजी महाराज, फैजपूर हे मार्गदर्शन करणार आहे .

स्थानिक संतोषीमाता बहुउ्देशीय हॉल शेजारील मैदान येथे दररोज सकाळी 6.30 ते 8.30 व संध्याकाळी 6.30 ते 9.00 या दरम्यान प्रशिक्षण शिबीर होणार आहे तरी मुलींनी जास्तीत जास्त संख्येने या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे . शिबीर यशस्वितेसाठी विश्वहिंदु परिषद, जय मातृभूमी क्रीडा मंडळ, शिवमुद्रा प्रतिष्ठान, भुसावळ जिल्हायांचे सहकार्य लाभत आहे .

(फोटो – संग्रहित )