भुसावळच्या विधीतज्ञ ॲड.जास्वंदी भंडारी यांची नोटरीपदी नियुक्ती

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील विधीतज्ञ ॲड.जास्वंदी भंडारी (पाटील ) यांची भारत सरकारच्या नोटरी वकीलपदी नुकतीच नियुक्ती झाल्याबद्दल सर्वस्थरातून त्यांचे कौतुक होत असून अभिनंदन होत आहे . मागील वीस वर्षांपासून वकीली क्षेत्रात काम करत असून महिला बार कॉन्सिलचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे . तसेच विविध सामाजिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत असतात .

या नोटरी नियुक्ती मुळे समाजात अजुन सेवा करण्याची संधी मिळाली असं मत अँड जास्वंदी भंडारी यांनी यावेळी व्यक्त केले.