अहिल्यादेवी कन्या विद्यालयाने इयत्ता दहावीच्या उज्वल निकालाची परंपरा यंदा देखील कायम राखली…

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील शिक्षण क्षेत्रात अग्रगण्य असलेली संस्था श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालयाने दरवर्षीप्रमाणे यंदा देखील इयत्ता दहावीच्या निकालामध्ये घवघवीत यश संपादित केले आहे शाळेचा एकूण निकाल 99.40% लागला आहे.. शाळेतील एकूण दहा विद्यार्थ्यांना 90% चे वर मार्क प्राप्त झाले आहे यंदाच्या दहावीच्या परीक्षेला शाळेतील 167 विद्यार्थिनी प्रविष्ट होत्या पैकी 80 विद्यार्थिनी विशेष प्राविण्यासह 68 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत सोळा विद्यार्थिनी तृतीय श्रेणीत तर दोन विद्यार्थिनी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत

शाळेतून प्रथम पूर्वजा किशोर काळे 97.20% गुण द्वितीय पूर्वा सचिन चौधरी 96.60% गुण तृतीय तनुश्री घनश्याम भोळे 96.00 टक्के गुण मागासवर्गीय विद्यार्थिनींमधून प्रथम प्राची प्रवीण वाघ 85.40% गुण

शाळेतील सर्व गुणवंत यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष सोनू मांडे यांच्या हस्ते सत्कार करून करण्यात आले यावेळी झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर संस्थेचे सदस्य श्रीधर खणके, अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मानसी कुलकर्णी पर्यवेक्षक श्री संजीव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते