रा .धो. माध्यमिक विद्यालयाला ललवाणी परिवाराकडून देणगी

भुसावळ- तालुक्यातील कुर्‍हे पानाचे येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संचालित रा.धो. माध्यमिक विद्यालयात कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य व ललवाणी फौंडेशन चे अध्यक्ष प्रा.डाँ. डि.एम ललवाणी यांचेकडून नातु चि.मनीत व आई स्व.ताराबाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन विद्यालयातील उत्कृष्ट विद्यार्थ्यास चि.मनीत ललवाणी पारितोषिक व उत्कृष्ट विद्यार्थिनीस स्व. ताराबाई ललवाणी पारितोषिक देण्यासाठी रुपये 11000 ची देणगी स्वरूपात भेट देण्यात आली आहे. ही देणगीची रक्कम कायमस्वरूपी ठेव ठेवण्यात येऊन त्यातील व्याजातून ही पारितोषिक देण्यात येतील. याप्रसंगी चेअरमन अप्पासाहेब एकनाथजी बडगुजर ,माजी मुख्याध्यापक आर.व्ही. गवळी ,मुख्याध्यापक एस.पी चौधरी,पर्यवेक्षक एस डी वाघ ऊपस्थीत होते.माजी मुख्याध्यापक आर व्ही गवळी यांनी सदरील पारीतोषीकासाठी चालना दिली.चेअरमन एकनाथजी बडगुजर यांनी सदरील ऊपक्रमाचे कौतुक केले असुन या मुळे ऊत्क्रुष्ट विद्यार्थ्यास समाधान वाटुन तो चांगला नागरीक होण्यास प्रव्रुत्त होईल असे नमुद केले.सदरील रकमेचा धनादेश मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांचेकडे सुपुर्द केला.