क्षेत्रीय महिला प्रमुख यांची यावल तालुक्यातील बोरावलला भेट ;

भुसावळ (प्रतिनिधी )- यावल तालुक्यातील बोरावल येथिल वस्तीला भेट देण्यासाठी क्षेत्रीय महिला वैशालीताई देशपांडे यांनी शुक्रवार रोजी भेट दिली .

11 एप्रिल रोजी वैशालीताई देशपांडे क्षेत्रीय महिला प्रमुख यांचा प्रवास भुसावळ जिल्ह्यात झाला त्यांना यावल तालुक्यातील बोरावल येथे वस्तीला भेट देण्यासाठी जिल्हा सचिव ॲड जास्वंदी भंडारी व प्रांत महिला प्रमुख मीनाताई वसावे होत्या वस्तीवर सर्वांचे भेटी व चर्चा होऊन लहान मुलांना खाऊ वाटप केला व तसेच त्यांना शबरी मातेची गोष्ट वैशाली ताई यांनी सांगितली गावातील गावकऱ्यांशी संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या

वस्तीवर बाल संस्कार केंद्र सुरू करण्या संदर्भात वस्तीवरील बांधव भगिनींशी चर्चा केली आणि त्यांच्या सोबत सहभोजनाचा आस्वाद घेतला .

दरम्यान यावल येथील देवगिरी कल्याण आश्रमाच्या कार्यालयासही त्यांनी भेट दिली यावेळी संघटन मंत्री वीरसिंग वसावे व भुसावळ येथील कार्यकर्ते मुकुंद दादा प्रचंड हे होते