भुसावळातील सर्पमित्रांनी फैजपुरच्या गोडाउन मध्ये सापाला पकडले ; सापाला दिले जीवदान

भुसावळ (प्रतिनिधी )-
फैजपूर शहरातील हनुमान मंदिरामागील रहिवासी व भांड्याचे व्यापारी मनोहर पुरूषोत्तम माहुरकर यांच्या गोदामात साप असल्याची माहिती त्यांनी भुसावळातील सर्प मित्र राहुल आराक यांना मंगळवार ७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता कळवली होती व त्यानंतर आराक यांच्यासह शहरातील सर्पमित्र स्कायलॅब डिसुझा यांनी फैजपूर येथे धाव घेतली.
यावेळी गोडावून मध्ये शोधले असता धामण जातीच्या बिनविषारी सापाला अलगद पकडत या सापाला जीवदान देण्यात आले असून
जंगलात सोडण्यात आल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. सर्प मित्रांनी दाखवलेली तत्परता व सतर्कतेबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *