भुसावळ : भुसावळ शहर व परिसरात आज राम नवमी रोजी विविध श्रीराम मंदिरां सह अन्य मंदिरासह नागरिकांनी मोठ्या भक्तिभावाने भगवान प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव अत्यंत आनंदात व उत्साहाने साजरा केला . गुढीपाडव्याचपासून ते रामनवमी पर्यंत उत्सव साजरा करण्यात आला यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम कीर्तन प्रवचन , आदी जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . सर्वत्र मंदिराची रंगरंगोटी व सजावट करुन विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रविवारी दुपारी ठीक बारा वाजता शहरातील सर्वच मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात राम जन्म सोहळा पार पडला. यावेळी दर्शनासाठी भाविकांची लांबच लांब लागल्या होत्या .

जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थान तर्फे श्री रामजन्माेत्सव साजरा ;

येथिल जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थान तर्फे रविवारी श्री रामजन्माेत्सवानिमित्त बहारदार श्रीरामाचा पाळणा तसेच भक्तीगिते सादर केल्याने भाविक राममय झाल्याचे दिसुन आले.
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही दि.६ राेजी राम नवमीनिमित्त मंदिरात फुलांची सजावट तसेच मंदिरावर आकर्षक राेषणाई करीत मंदिर परिसरात मंडपही टाकण्यात आलेला हाेता. प्रारंभी श्रींचे स्नान अभिषेक पूजा स.५:३०. ते ७:३० पर्यंत झाली. तद्नंतर दुपारी १२ वाजता रामजन्माेत्सवानिमित्त श्री रामाची पूजा तसेच आरती यजमानांच्या हस्ते केली गेली. तद्नंतर उपस्थित महिला भगिनींनी श्री रामाचा पाळणा सादर केला. तसेच
यावेळी ‘स्वामी माझा राम’ ही संगीत मैफिल उत्साहात संपन्न झाली. यात प्रसिद्ध गायक व निवेदक किरण सोहळे यांनी एकाहून एक सरस भक्ती गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.प्रारंभी ‘राम जन्माला ग सखी’ या गीताने शुभारंभ करण्यात आला. यानंतर ‘प्रभाती सूर नभी रंगती’, ‘उठी उठी गोपाळा’, ‘उठी श्री रामा’, ‘घनश्याम सुंदरा’ हि गीते सादर करण्यात आली, ‘दशरथा घे हे पायसदान’, ‘विश्वाचा विश्राम रे’, ‘माझे माहेर पंढरी’,’अबीर गुलाल’,’नादातुन या नाद निर्मितो’,’गा बाळांनो श्रीरामायण’ तसेच योगेश साळशिंगीकर यांनी ‘हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा’ , ‘जगमे सुंदर है दो नाम’ हि भक्ती गीते सादर करत वातावरण भक्तीमय केले.
‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’ आणि ‘हेची दान देगा देवा’ या भैरवीने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.हार्मोनियम वर योगेश साळशिंगीकर यांनी तर तबल्यावर तुषार पुराणिक यांनी साथसंगत केली. किरण सोहळे यांनी सुत्रसंचालन केले. महाप्रसादाचा लाभ बहुसंख्य भाविकांनी दु.१ ते ३ वाजेपर्यंत पंगतीमध्ये घेतला. यावेळी सेवेक-यांनी केलेले कामाचे उत्कृष्ट नियाेजन दिसत हाेते. रात्री उशिरापर्यंत भाविक येत हाेते.
पुरातन श्री राम मंदिरात रामभक्तांसह भाविकांची मांदियाळी*

शहरातील सराफ बाजारातील श्रीराम मंदिरात दुपारी 12 वाजता मोठ्या आनंदात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला . यानिमित्त गुढीपाडव्या पासूनराम नवमी पर्यंत दररोज काकड आरती , भजन , कीर्तन , प्रवचन , यासह रामरक्षा आदी विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले . श्रीराम नवमी निमित्त कीर्तन सोहळ्या नंतर जन्म उत्सव साजरा करण्यात आला .यावेळी सुवासिनींनी पाळणा व गीत सादर केले . तसेच केळी लाडू सुंठवड्याचा प्रसाद वाटप करण्यात आला .


‘



