भुसावळ (प्रतिनिधी ) – येथिल जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थान तर्फे राम नवमीनिमित्त दि.६ एप्रिल रोजी दुपारी १ ते ३ पर्यंत महाप्रसादाचे आयाेजन केलेले आहे.
रविवारी प्रारंभी श्रींचे स्नान अभिषेक पूजा स.५:३०. ते ७:३० हाेईल. तद्नंतर दुपारी १२ वा. श्री राम जन्माेत्सव साजरा केला जाईल, तरी या सोहळ्यास उपस्थिती द्यावी. दरम्यान ज्या भाविकांना मंदिरात सेवा द्यायची असेल त्यांनी व महाप्रसादासाठी गहु, तुरदाळ, तेल, राजगिरा लाडू,केळी अथवा देणगी द्यावयाची असल्यास त्यांनी ६ राेजी पर्यंत जामनेर राेडवरील गजानन महाराज देवस्थान सेवेक-यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




