भुसावळातील तरुणाला मारहाण : मोबाईलसह रोकड लूटली : दोघां अज्ञातां विरोधात गुन्हा दाखल ;

भुसावळ (प्रतिनिधी) : रस्त्याने पायी जात असलेल्या शहरातील 40 वर्षीय तरुणाला अज्ञात दोघांनी मारहाण करीत त्याच्या खिशातील दोन हजारांची रोकड व 14 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवल्याचा प्रकार 25 मार्च रोजी रात्री 11 वाजता घोडेपीरबाबा दर्ग्याजवळ घडला. याप्रकरणी अज्ञात दोघांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मनोज रामचरण शर्मा (40, रा.शिरपूर कन्हाळा रोड, भुसावळ) येथे हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. 25 मार्च रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास मनोज हा शहरातील नाहाटा चौफुली येथून घरी पायी जात असताना घोडेपीर बाबा दर्ग्याजवळ अज्ञात दोघांनी त्यास अडवत मारहाण करीत तरुणाच्या खिशातील 14 हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि दोन हजारांची रुपयांची रोकड लुटली. मनोज शर्मा यांनी बुधवार, 2 एप्रिल रोजी रात्री 10.30 वाजता भुसावळ बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्यावरून अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यत आला. तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश कोळी करीत आहे.