. भुसावळ ( प्रतिनिधी ) इनरव्हील क्लब भुसावळ तर्फे शहरात विविध ठिकाणी समाजपयोगी उपक्रम राबविण्यात आले .उन्हाळ्यात नागरिकांसाठी मोफत जलसेवा उद्घाटन यासह पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षारोपण इंटरनॅशनल इनरव्हील ट्रेझर डॉक्टर रश्मी शर्मा आणि प्रतिष्ठा महिलांमंडळ अध्यक्षा रजनी सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले . या प्रोजेक्टला जेष्ठ सदस्या श्रीमती विमल राव या एक महिन्याच्या पाण्याचा खर्च देण्याचे सांगितले . तर सौ .रजनी सावकारे ह्यांनी सुद्धा पुढचा महिण्याचा खर्च देण्याची ग्वाही दिली प्रोजेक्टला स्वाती देव ह्यांनी हॉटेल अतिथी पॅलेस जामनेर रोड शेजारी जागा उपलब्ध करून दिली ह्या प्रोजेक्ट बद्दल भुसावळकरांनी इनरव्हील क्लब चे आभार मानले.

इनरव्हील क्लबच्यावतीने महत्वकांक्षी प्रकल्प अंतर्गत येथील गोकुळधाम सोसायटीमध्ये बगीचा सुशोभित करणे , श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराचे संरक्षण भिंत चे जीर्णोद्धार करणे यासाठी क्लब तर्फे सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे . क्लब तर्फे इंटरनॅशनल ट्रेझर डॉक्टर रश्मी शर्मा व प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे व क्लबच्या अध्यक्षा राजश्री कात्यायनी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सदर कार्यक्रमास माजी नगरसेवक बापू महाज यांचेसह परिसरातील महिला , जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

बगीच्या विकास या प्रोजेक्टसाठी इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा सौ रजनी सावकारे यांनी वस्त्रोद्योग मंत्री नामदार संजय जी सावकारे यांच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले. त्याच बरोबर बगीचाची उत्तम निगा राहील ह्याची जबाबदारी नागरिकानी सुद्धा घ्यावी असे आवाहन केले तर सदर कार्यक्रमाला इंटरनॅशनल ट्रेझर डॉक्टर सौ रश्मी शर्मा यांनी सुद्धा जी मदत लागेल ते देण्याचे जाहीर केले.तिवारी मॅडम यांनी 51 हजार ची देणगी देण्याची घोषणा यावेळी केली , तर मनीषा तायडे यांनी लहान मुलांसाठी झोके , वैशाली भगत यांनी पण लागेल ती मदत देण्याची व .आशा पाटील यांनी सुद्धा लहान मुलांसाठी झोका , संगीता जाधवांनी ह्यांनीही मदत देण्याचे यावेळी ग्वाही दिली
*इंटरनॅशनल ट्रेझररपदी डॉ . सौ रश्मी शर्मा यांची पुन्हा निवड*:
सौ रश्मी शर्मा ह्यांची सलग दुसऱ्यांदा इंटरनॅशनल ट्रेझर म्हणून निवड झाल्या बद्दल इनरव्हील क्लब भुसावळच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठा महिलांमंडळ अध्यक्षा रजनी सावकारे यांच्या हस्ते डॉ रश्मी शर्मा यांचा सत्कार करण्यात आला . तसेच इंनरव्हील क्लबतर्फे अध्यक्षा राजश्री कात्यायनी व सचिव प्राची राणे यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या . भुसावळ इनरव्हील क्लबच्या कार्याच्या माध्यमातून आज आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळाली व तीही पुन्हा दुसऱ्यादा यात नक्कीच सर्वांचे सहकार्य व उत्कृष्ट कार्य असल्याची भावना डॉ रश्मी शर्मा यांनी व्यक्त केली . भुसावळ शहरात क्लबतर्फे बगीचा सुशोभिकरणासाठी सहकार्य करणार अशी ग्वाही देवून या कार्यास इतरांनीही मदत करावी असे आवाहन केले .
सत्कार इंनरव्हील क्लब अध्यक्षा राजश्री कात्यायनी व सचिव प्राची राणे , यांचेसह,विमल राव , स्वाती देव , तिवारी मॅडम , वैशाली भगत , मनीषा तायडे , संगीता जाधवांनी , सदस्या व्यतिरिक्त कमल सचदेव,राणी छाबडा, रुचिका शर्मा,सुनंदा भारुडे मनिषा वानखेडे संगीता चांडक आदी महिला सदस्या उपस्थित होत्या. प्रसंगी डॉ सौ रश्मी शर्मा , सौ रजनीताई सावकारे व राजश्री यांनी आपले मनोगत व्यक्त केले सचिव राणे यांनी सूत्रसंचलन व आभार व्यक्त केले . राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली



