भुसावळ (प्रतिनिधी ) : सिंधी समाजाचे दैवत असलेल्या भगवान झुलेलाल यांच्या जन्मोत्सवानिमित्त सिंधी कॉलनीमधून रविवारी काढण्यात आलेल्या शोभायात्रेने भुसावळकरांचे लक्ष वेधले. डीजेच्या तालावर युवकांनी ठेका धरला. यावेळी शोभायात्रेत सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त सिंधी समाजबांधव सहभागी झाले. युवक-युवतींचा शोभायात्रेत मोठा सहभाग होता.

समाजबांधवांनी काढली दुचाकी रॅली
सिधी समाजातर्फे चेट्रीचंड उत्सवाचे आयाोजन केले होते. याच पार्श्वभुमीवर रविवारी सकाळी आठ वाजता सिंधी समाजबांधवांनी दुचाकी रॅली काढली होती. ही रॅली शहरातील सिंधी कॉलनीतून सुरू होऊन जामनेर रोड, ब्राम्हण संघ, नृसिंह मंदिर, अप्सरा चौक, मरीमाता मंदीर, सराफ बाजार, गांधी चौक, मॉडर्न रोड, बाजारपेठ पोलीस ठाणे, पांडुरंग टॉकीज, वाल्मीक नगर परत जामनेर रोड या मार्गाने नाहाटा चौफुलीजवळ जाऊन तेथून सिंधी कॉलनीत रॅलीचा समारोप झाला. या रॅलीत सुमारे 600 पेक्षा जास्त दुचाकीस्वारांनी सहभाग घेतला होता. रविवारी दुपारी 12 वाजता शहरातील सिंधी कॉलनीमधून झुलेलाल मंदीरापासून शोभायात्रेला सुरूवात झाली. समितीचे अध्यक्ष जयपाल रोहेडा यांच्याहस्ते भगवान झुलेलाल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मंदीरात मोठ्या प्रमाणावर समाजबांधवांची उपस्थिती होती. शोभायात्रेत चार हजारापेक्षा जास्त समाज बांधवांची उपस्थिती होती. डीजेच्या तालावर युवक, युवती नाचत होते. यावेळी मनोहर सोडाई, माजी नगरसेवक निकी बतरा, अॅड.मनीष सेवलानी, भारतीय सिंधू सभेचे प्रदेश अध्यक्ष दिनेश दुधानी, नारायणदास छाबडीया आदी समाजबांधव उपस्थित होते. स्व.मिरादेवी झुलेलाल मंदिर येथेही पूजा होऊन रात्री भंडार्याचे आयोजन अनिल डुबा यांनी केले. सनमुखदास मनवानी, जय राम मुलचंदानी, गोपाल कमनानी, अनिल बजाज, अमर बजाज यांनी सहकार्य केले.


