एम आय तेली इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये कर्तबगार महिलांचा गौरव; महिला दिन साजरा ;


भुसावळ – दि- ८ मार्च शनिवार रोजी एम आय तेली इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये जागतिक महिला दिन भव्य कार्यक्रम व महिलांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले. यत्र नारिय पूजन्ते रमन्ते तत्र देवता निमित्ताने शिक्षक दिन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व कार्यक्रमाला सुरुवात झाली. अतिशय रोमहर्षक आनंदी असे वातावरण असून विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी भाषणे, कविता, आणि मुख्यत्वे करून स्त्री विवंचना आणि देशभक्ती शिक्षणाप्रती आवड ओढ , संसारिक जीवन या विषयाला अनुसरून नाटक सादर केले. नाटकाला भरारी घेण्यासाठी व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्यासाठी शाळेतील वरिष्ठ शिक्षिका अंजुम खान यांनी महत्त्वाचे योगदान दिले.


व्यासमंचावर एम आय तेली. इंग्लिश मिडियम-स्कूल चे संस्था अध्यक्ष हाजी मुन्ना तेली सर, संचालक अख्तर भाई पिंजारी, आशिक भाई तेली, , जलील कुरेशी, हाजी साबीर सर, शेख हुस्नोद्दीन, दादा, सुलेमान तडवी, हाजी रहिमोद्‌दीन दादा, आसिफ भाई तेली, हाजी अय्यूब सरा मुख्याध्यापक हाजी सैय्यद वाजिद अली सर आदि मान्यवर उपस्थित होते तसेच व्यासपीठावर मा. निशाद परवीन शेख अशफाक , मा. फिरदोस खान फिरोज खान, मा. आफरीन नदीम मेमन, मा.अल्फिया अख्तर हुसेन कुरेशी, मा. आफ्रिन शेख, मा. रजिया सुलताना, मा. निखत शेख आदि मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी अध्यक्ष हाजी मुन्ना तेली सर यांनी महिला दिनाचे औचित्य साधून त्याग मूर्ती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून दीप प्रज्वलित केले. आपल्या मनोगतामध्ये स्त्री ही सामाजिक कणा असून अनंत काळाची माता आहे. हे मनोगत हाजी मुंन्ना तेली त्यांनी मांडले. एम आय तेली इंग्लिश मिडियम स्कूलच्या शिक्षक व शाळे मध्ये कार्यरत असलेल्या प्रभावी कुशल नेतृत्व व्यासंगी सामाजिक कार्यकर्त्या अंजुम खान व एम. आय. तेली इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने हा कार्यक्रम करण्यात आला.

व्यासपीठावरील मान्यवरांचे व उपस्थित शिक्षिका वृंदाचे गुलाब पुष्प, पेन व वही , मान‌चिन्ह देऊन सत्कार मूर्तीचा चा सन्मान करण्यात आला. ‘ व्यासंग, समाजहितार्थ त्याग, चैतन्यमयता आदि हात देऊन कार्यक्रम साकार करण्यात आला.. तसेच शाळेचे मा. मुख्याध्यापक- हाजी सैय्यद वाजिद अली सर यांनी महिला दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद, कर्मचारी यांनी सहकार्य घेतले प्रभावी सूत्रसंचालन . बेनझीर शेख यांनी केले. तर आभार प्रदर्शन कविता मेढे यांनी केले.