भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ विभागात जळगाव-भादली स्थानकांदरम्यान (किमी 423/17-19) चार पदरी रेल्वे उड्डाणपुलाच्या (ROB) 58 मीटर गर्डर लाँचिंगसाठी विशेष वाहतूक व पॉवर
ब्लॉक घेतला जात आहेत. हा उड्डाणपूल तरसोद-फागणे (NH-6) महामार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पांतर्गत (किमी 422.700 ते किमी 510.00) अंतर्गत बांधला जात आहे. यासाठी भुसावळ विभागात अप व डाऊन लाईन तसेच तिसरी व चौथी लाईन यांवर विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे खालील गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

दिनांक ०१.०३.२०२५ रोजी गाड्यांचे वेळापत्रक –
१) गाडी क्रमांक १२५२० अगरतला -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ०१.१५ तास रेगुलेट करण्यात येईल.
२) गाडी क्रमांक १२३३५ भागलपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
३) गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
४) गाडी क्रमांक १९०४६ छपरा -सुरत एक्सप्रेस विभागात ३० मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
५) गाडी क्रमांक ५९०७६ भुसावळ -नंदुरबार पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेपेक्षा २ तास उशीराने भुसावळ स्थानक येथून सुटेल.
दिनांक ०२.०३.२०२५ रोजी गाड्यांचे वेळापत्रक –
१) गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
२) गाडी क्रमांक १९०४६ छपरा -सुरत एक्सप्रेस विभागात ३० मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
३) गाडी क्रमांक १२७४२ पटना -वास्को दि गामा एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
४) गाडी क्रमांक ५९०७६ भुसावळ -नंदुरबार पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेपेक्षा २ तास उशीराने भुसावळ स्थानक येथून सुटेल.
दिनांक ०३.०३.२०२५ रोजी गाड्यांचे वेळापत्रक –
१) गाडी क्रमांक २२१२२ लखनौ – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात १ तास १५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
२) गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
३) गाडी क्रमांक १९०४६ छपरा -सुरत एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
४) गाडी क्रमांक २२३११ भागलपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात ४५ मिनिटे रेगुलेट करण्यात येईल.
४) गाडी क्रमांक ५९०७६ भुसावळ -नंदुरबार पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेपेक्षा २ तास उशीराने भुसावळ स्थानक येथून सुटेल.
प्रवाशांनी हा बदल लक्षात घेऊन प्रवासाची योजना आखावी.


