पुण्यातील हिंजवडी परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंजवडी येथील परदेशी तरूणींकडून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी कारवाई करत या सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे.

पोलिसांनी बंगल्यावर छापा टाकत ४ परदेशी तरूणींची सुटका केली आहे. या प्रकरणात परदेशी दलाल महिलेच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयटी हिंजवडी परिसरात आरोपी परदेशी तरूणी काही तरूणींकडून वेश्या व्यवसाय करून घेत होती. जास्त पैसे मिळवून देण्याचं आमिष दाखवून एक परदेशी महिलेने ४ थायलंड महिलांना भारतात आणले. शिवाय त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होती. याची गोपनीय माहिती पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला प्राप्त झाली.
माहिती मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी एक सापळा रचला, हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील कासार साई धरणाजवळ एक बंगला बुक केला. त्या बंगल्यात पोलिसांनी एका व्यक्तीला पाठवले. नंतर पोलिसांनी धाड टाकून सेक्स राकेट उघडकीस आणला. पोलिसांनी बंगल्यावर छापा टाकत ४ परदेशी तरूणींची सुटका केली आहे. नंतर परदेशी दलाल महिलेच्याविरोधात हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


