भुसावळात रेल्‍वे तर्फे कोरोना प्रतिबंधात्‍मक औषधी वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथे आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या आणि मुख्यालयाच्या सल्ल्यानुसार कोविड 19 प्रतिबंधात्मक होमिओपॅथिक औषध कर्मचारी सहायता समितीद्वारा भुसावळ मंडळाच्यावतीने वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन डी गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनानुसार दिनांक 1 एप्रिल रोजी भुसावळ येथे सर्व विभाग व डिपो मधील सर्व कर्मचार्‍यांना या औषधीचे वाटप करण्यात येत आहे .तसेच सर्व विभाग मध्ये आणि स्टेशन कर्मचाऱ्यांना याचे वाटप करण्यात येत आहे .
कोरोना दुष्प्रभाव कमी करण्यासाठी या औषधीचा मूळ उद्देश आहे. हे औषध वाटप करण्याचे कार्य सहाय्यक कार्मिक अधिकारी परदेसी आणि सर्व कल्याण निरीक्षक यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *