भुसावळ (प्रतिनिधी )-
कोविड १९ या विषारी वायु च्या प्रादर्भाव रोखण्याकरीता सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले आहे.या लॉक डाऊन मध्ये गर्दी टाळण्याकरीता मंदिरे सुद्धा बंद करण्यात आली आहे . यामुळेआज गुरुवार दिनांक २ रोजी चैत्र शुद्ध नवमी प्रभु श्रीराम जन्मोत्सव निमित्त सुद्धा शहरात सर्व मंदिरात फक्त पुजारी यांनीच पूजाविधि करून अत्यंत साध्या पद्धतीने जन्मोस्तव साजरा केला .
येथील राम मंदिर वार्ड भागातील श्रीराम मंदिर येथे , श्रीराम चौक, सौ, सरिता चौक, पप्पु इखंनकर, शाम इखंनकर यांचे उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला . श्रीराम यांना महाअभिषेक करून पूजा अर्चना करण्यात आली . पहिल्यांदाच बंद मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा होण्याची पहिलीच वेळ आहे . सर्व रामभक्त भाविक आज जरी आपले दैवताचा उत्सव करु शकले नसले तरीही श्रीराम कोरोनाच्या या भयानक संकटातून भक्तानां नक्कीच तारतील असा दृढ़ विश्वास उराशी बाळगुन सर्वानी घरातच राहून घराघरात पूजा करून जन्मोस्तव साजरा केला .



