प्रोटॉन व आर एम.बी.के.एस संघटनेचे पदाधिकारी देखील सरसावले गरीबाच्या मदतीला

वरणगाव (प्रतिनिधी )-
कोरोना व्हायर्सचा वाढत प्रादुर्भावा मुळे सम्पूर्ण देशात कलम १४४ व संचार बंदी लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे गोर गरीब लोकांना उपवास मारीची वेळ आलेली आहे शासन धान्याची मदत करीत आहे मात्र जीवन जगताना दररोज घरात किराणा मालाची देखील गरज असते तसेच आज १० ते ११ दिवसा पासून हात मजुरांच्या हाताला काम नाही दुकानातून किराणा अथवा भाजी पाला विकत घेणे गरिबांना शक्य नाही म्हणून प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर (प्रोटॉन) संघटनेच्या सदस्यांनी मदत जमा करून यावल तालुक्यातील यावल शहर, हिंगोना, भुसावल शहरातील काही भागात सकाळी ७ ते ९.३० च्या दरम्यान संचार बंदीचा नियम पाळत गरजू लोकांना मदत करण्यासाठी पुढे येत ३ किलो गहू,एक किलो गोडे तेल,अर्धा किलो तुरदाळ,२०० ग्राम मोरची पावडर,अर्धा किलो साखर,१००ग्राम चहा पावडर,तसेच कोरोना व्हायर्सचा वाढता प्रादुर्भावा मुळे नागरिकांनी वारंवार हात सबनानी धुवावे असे सांगितले जात असल्याने हात स्वच्छ धोण्यासाठी एक साबण देखील देण्यात आलेला आहे ही मदत प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेत्तर संघटनेचे (प्रोटॉन) महाराष्ट्र राज्याचे सचिव गणेश पी काकडे ,जाधव जिल्हा प्रभारी आनंद कुमार, प्रमोद नेमाडे ,किरण टोकरे ,आनंद शिंदे ,पप्पू वानखेडे ,दिलीप सुरवाडे राजेंद्र बाविस्कर,हरिष पाने, मुकुंद नामदास तसेच आर. एम .बी.के.एस चे भुसावळ झोन अध्यक्ष अरुण म्हस्के, आर बी परदेशी,विनोद सूर्यवंशी, प्रेम जाधव,प्रमोद तायडे,जगदाने साहेब, या सर्वांनी तसेच याच्या सहकारी मित्र मंडळीने मदत गोळा करून गरजू लोकां पर्यत पोहोचवली तसेच सामाजिक आपुलकी ठेवून सुज्ञ नागरिकांनी जनतेच्या सहकार्यासाठी पुढे यावे असे आव्हान प्रोटॉन संघटनेचे राज्य सचिव गणेश पी काकडे यांनी केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *