भुसावळ (प्रतिनिधी )-
नगरपालिकेतर्फे कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्याधुनिक मशीन द्वारे सोडियम हायपोक्लोराईड ची फवारणी शहरातील विविध भागात करण्यात आली . याअन्तर्गत येथील प्रभाग 10 मध्ये फवारणी करण्यात आली .
यावेळी नगरसेवक प्रा. दिनेश राठी सर ,देवा वाणी, पालिकेचे अधिकारी प्रदीप पवार , राठोड ,यांचेसह अधिकारी व कर्मचारी तसेच डिगंबर सराफ ,शाम भारंबे , रूपेश चौधरी ,अमोल सोनार ,शंभु फालक , जितू सोनवणे , पवन शिंदे ,हर्षल गंथड़े ,विनय चौधरी, चेतन आंबोले, रोहन भोळे, सागर शिंदे , निहाल बोरोले व सर्व देवा वाणी मित्र परिवार यांनी सहकार्य केले . विशेषत: फवारणी दरम्यान सुद्धा सोशल डिस्टनसिंग नियम काटेकोरपणे पाळला .



