कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर साकेगाव-कंडारी मतदारसंघातील उत्कृष्ट काम करणार्‍या गावाला अधिकाधिक निधी देणार – जि प सदस्य रवींद्र पाटील यांची माहिती

भुसावळ (प्रतिनिधी ) –
कोरोना या संसर्गजन्य विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर विविध व उत्तमोत्तम उपाय व उपक्रम राबावीणाऱ्या प्रत्येक गावा-गावात सामान्य माणसापासून ते ग्रामपंचायतीतील सदस्य जोमाने काम करीत आहेत. आरोग्याच्या संदर्भात गावाच्या दृष्टीकोणातून उपाययोजना करण्यामध्ये जी ग्रामपंचायत व स्थानिक कोरोना समिती तथा सेवाभावी ग्रामस्थ अधिक उत्कृष्ट काम करतील, अशा साकेगाव-कंडारी मतदारसंघातील गावांचा प्रशासकीय यंत्रणेच्या व समितीच्या माध्यमातून अहवाल उत्कृष्ट येईल, अशा गावांना आपल्या जिल्हा परीषद विकास निधीतून जास्तीत-जास्त विकास निधी देणार असल्याची ग्वाही जिल्हा परीषद सदस्य रवींद्र पाटील यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *