भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन सुरू असल्याने हातावर पोट भरणार्यांचा रोजगार हिरावला गेला आहे. त्यातच एस.टी.बसेस, रेल्वे तसेच खाजगी वाहतूकही ठप्प झाल्याने अनेक गोर-गरीब पायीच आपापल्या गावाकडे निघाले आहेत तर शहरातील विविध भागातही गरजूंच्या जेवणाची परवड होत असल्याचे पाहून भुसावळातील लोहमार्गचे कर्तव्यनिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांनी माणुसकीचे दर्शन घडवत गरजूंसाठी जेवणाची सोय केली आहे. यावेळी कर्तव्याची जाण ठेवत लोहमार्ग कर्मचार्यांना सोबत घेवून डंबाळे यांनी शहरातील रेल्वे स्थानक परीसरातील अनेक गरजूंना तसेच महामार्गावरून पायीच प्रवास करणार्या प्रवाशांची जेवणाची व्यवस्था करून त्यांना जेवण देवून त्यांची भूक भागविली आहे . लॉक डाउन व संचारबंदी सुरु झाल्यापासुन हा उपक्रम सुरू असल्याने नागरीकांनी लोहमार्ग पोलिस प्रशासनाचे मनापासून आभार मानले आहेत.



