भुसावळ (प्रतिनिधी )-
अयोध्या नगर परिसरातील शंतनू गणेश पाथरवट यांनी स्वतःचा वाढदिवस कोरोना व संचारबंदी च्या पार्श्वभूमिवर रोजगार नसल्यामुळे संकटात सापडले तापीनदी जवळील गोरगरीब लहान मोठे, पुरूष, महिला, वृद्ध, भुकेलेल्यां लोकांना अन्नदान करून साजरा केला.
अन डोळे पाणावले ;
पोटाला भुक लागते; अन्न मिळत नाही एक आस असते आणि अचानक अन्न दीसताच ते जेव्हा हातात मिळते त्या वेळेस त्यावर तूटुन पडतात . एक आस आज त्या गरजवंतांकडे बघून अतिशय तिव्रतेने जाणवली आणि डोळे पाणावले. देवाने या संकटातुन लवकरच सर्वांना बाहेर काढावे अशी प्रार्थना यावेळी शंतनू पाथरवट व राम रणधीर,अतुल गोसावी, किशन चावला, निलेश आंबेकर, छोटू शहा, भावेश पाटील यांनी केली.



