भुसावळ – 26 जानेवारी रोजी बोदवड येथे संताजी महिला मंच मार्फत गुणवंतांचा सत्कार सोहळा आणि महिलांचा स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
प्रारंभी कुमारी यज्ञा , अभिस्टा, आणी अक्षदा यांनी स्वागत नृत्य सादर करून उपस्थितांचे स्वागत केले.प्रवेश द्वारावर लीला नायसे , वैशाली चौधरी, सोनाली तेली, डॉ सुरेखा तेली, जयश्री खेवलकरा
यांनी हळदीकुंकू तिळगूळ आणि वाण देवून आलेल्या महिलांचे स्वागत केले त्यानंतर मनीषा चौधरी , सविता कपले,कमलबाई तेली..प्रमुख अतिथी डॉ वीरेंद्र चौधरी आणि मंचाच्या अध्यक्ष डॉ वृषाली चौधरी यांचे मंचावर आगमन झाले मान्यवरांच्या हस्ते संताजी महाराज प्रतिमापूजन करण्यातआले…कार्यक्रमाचे प्रास्ताविक ममता चौधरी यांनी केले तर सूत्रसंचलन श्रद्धा अंजाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सुरुवातीला मतदार दिन आणि बालिका दिनाचे औचित्य साधून जबाबदार नागरिकत्वाची जाणीव म्हणून मतदार शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख वक्तेम्हणून , डेव्हलपमेंट ऑफिसर एलआयसी इंडिया ,भुसावळ डॉ विरेंद्र चौधरी यांनी महिलांना आर्थिक साक्षरता या विषयात मार्गदर्शन केले. त्यासोबतच एलआयसी च्या बचत सखी या महिलांसाठी नवीन उद्योग संधीची माहिती दिली त्यासोबतच महिलांना आर्थिक साक्षरता म्हणजे काय याची नॉमिनेशन , बँक खात, गुंतवणूक सुरक्षा, गुंतवणूक आणि बचतीचे अनेक मार्ग आणि त्यातून संपत्तीची वाढ अशा विषयांच्या आशयातून व उदाहरणांच्या माध्यमातुन आर्थिक साक्षरता म्हणजे काय हे महिलांसमोर मांडून विस्तृत माहिती दिली .


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संताजी महिला मंच च्या संस्थापक अध्यक्ष डॉ वृषाली प्रमोद चौधरी या होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मंच स्थापनेची ध्येय आणि उद्दिष्टे जाहीर केली. आर्थिक साक्षरतेचे महत्व सांगून महिलांनी घराचे जमाखर्च लिहिन्यापासून सुरुवात करावी असे त्यांनी आवाहन केले तसेच .संताजी महिला मंच मार्फत समाजातील हुशार होतकरू गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहिर केले. त्याचबरोबर समाजातील गुणवंतांचा सत्कार यावेळी करण्यात आला. एमबीबीएस पूर्ण करून स्त्रीरोग विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन करणारी डॉ शिवानी राजेश अंजाळे, तसेच पोस्ट खात्यात नुकतेच नेमणूक झालेली कुमारी संस्कृती पंकज चौधरी
यासोबत.कुमारी वैष्णवी अरुण चौधरी इयत्ता 10वी,12वी व पदवीधर या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सत्कार समारंभाचे सूत्रसंचलन स्वाती खेवलकर , यांनी केले त्यासोबतच सखी मंच संस्थापकांपैकी सौ ममता चौधरी यांनी कौटुंबिक जबाबदाररी सांभाळून एम ए बीएड करून. उच्च श्रेणीत शिक्षण पूर्ण केले .त्यानिमित्ताने त्यांचा गौरव करून संताजी मंचने समाजासाठी एक आदर्श समोर मांडला…कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोल्डन अवर हॉस्पिटल, भुसावळ यांच्या मार्फत बीपी आणि जनरल हेल्थ कॅम्प चे नियोजन करण्यात आले होते.त्याचे व्यवस्थापन गीता तेली व सहकारी यांनी पाहिले.

सकाळी आयोजित रांगोळी स्पर्धेत संताजी महाराज, प्रजासत्ताक दिन, हळदीकुंकू, महिला सुरक्षा आणि अत्याचार प्रतिबंधक अशा विषयाला अनुसरून महिलांनी रेखीव व सुंदर रांगोळ्यां चे प्रदर्शन केले होते. रांगोळी स्पर्धेचे नियोजन व्यवस्थापन प्रतिभा सोनटक्के आणि ममता चौधरी यांनी पाहिले. बचतीचा संदेश आणि हाक देत समाजात कौटुंबिक सलोखा आणि जिव्हाळा निर्माण व्हावा या हेतूने सुरू केलेल्या आणि उत्तम रीतीने कार्यरत असलेल्या समाजाच्या तीन बचतगटाच्या अध्यक्ष आणि सगळ्यांचे कौतुक त्या ठिकाणी करण्यात आले आणि ट्रॉफी गुलाबपुष्प देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी तेलीसखी महिला बचत गट अध्यक्ष पूनम चौधरी दोलेश्वर महिला बचत गट अध्यक्ष पल्लवी जवरे आणि अभिनंदन महिला बचत गट लता तेली यांनी आपल्या सदस्यांसोबत सत्कार स्विकारला..

रांगोळी स्पर्धेचे प्रथम बक्षीस कुमारी कृष्णाली अजय चौधरी ,द्वितीय गौरी सुनील बोरे याना गुलाबपुष्प आणि ट्रॉफी देवून गौरविण्यात आले. त्यानंतर मनोरंजनासाठी संगीत खुर्ची आणि बकेट बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धाचे नियोजन नियोजन सविता चौधरी ,प्रिति चौधरी, यांनी पाहिले..त्यामधे संगीतखुर्चीमध्ये सौ.ललिता पवन पाटील , बकेट बॉल स्पर्धेत
विजेत्या दिपाली खेवलकर आणि कांचन खेवलकर ठरल्या..त्यानाही ट्रॉफी गुलाबपुष्प आणि गिफ्ट देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांमधून काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ च्या विजेत्या…रेखा बोंभे यांचा सत्कार करून महिलांच्या हस्ते हस्ते साडी बक्षिस दिली . चहापान तिळगूळ वाण वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली..कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पूनम चौधरी यांनी केले. .कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य सुभाष चौधरी यांनी हॉल , शिरसोले बंधू, व दिपक चौधरी सर, श्री फाटे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पूजा अंजाले , दिपाली फाटे,ललिता चौधरी यांनी परिश्रम घेतले .



