भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूलचे गॅदरींग सोमवारी संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे,जवाहर नवोदयचे प्राचार्य आर आर खंडारे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे हे होते

तर व्यासपीठावर ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक ,चेअरमन महेश फालक ,सेक्रेटरी विष्णू चौधरी,प्रिन्सिपल निना कटलर उपस्थित होते. सुरुवातीला वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन व सरस्वती पूजन झाले.
याप्रसंगी संजय सावकारे यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले ते म्हणाले की स्वतःच्या मेहनतीने मिळवलेले मार्क हे कधीही चांगले मार्क असतात.म्हणून पालकांनी कधी आपल्या मुलांना मेहनत करायला शिकवली पाहिजे.भुसावळतील ताप्ती पब्लीक स्कुल हे चांगले एज्युकेशन आहे.मुलांना थोडं फ्री ठेवा म्हणजे तो चांगला डिसिप्लिन मध्ये राहतो. मुलांचं मन सांभाळा,आपण जुन्या विचारायचे आहोत आणि आताचे मुलं हे नवीन विचाराचे आहेत पण सांगड कशी घालायची हे शिकलं पाहिजे.
जवाहर नवोदय चे प्राचार्य आर आर खंडारे व ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल निना कटलर यांनी देखील यावेळी मार्गदर्शन केले.प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विवीध गीतांवर नृत्य सादर करून आपले कला गुण सादर केले.
यात गणेश वंदनाने सुरुवात करण्यात आली तसेच भारतीय संस्कृतीवर विविध प्रकारची नृत्य करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. सूत्रसंचालन सोफीया पी बॉडी व शेख कय्युम यांनी यांनी केले तर आभार प्रिन्सिपल निंना कटलर यांनी मानले.
फोटो कॅप्शन – ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या गॅदरिंग मध्ये नृत्य सादर करताना चिमुकले.


