अ.भा. लेवा युवक महासंघ प्रणित बहिणाई ब्रिगेड भुसावळतर्फे संक्रांतीनिमित्त वाण वाटप ;

भुसावळ – अ.भा. लेवा युवक महासंघ प्रणित बहिणाई ब्रिगेड भुसावळ परिसर तर्फे दिनांक27/01/2025
रोजी नाभिक समाज मंगल कार्यालय शिव कॉलनी येथे मकरसंक्रांत निमित्त हळदी कुंकु कार्यक्रम घेण्यात आला

यावेळी नहाटा महाविद्यालय प्रा .सौ डॉ गौरी पाटील यांनी आपण संपूर्ण समाजाच्या महिलांनी कश्यासाठी व का एकत्र आले पाहिजे यावर उत्तम मार्गदर्शन केले आणि आजच्या कार्यक्रमाचे वाण सुद्धा डॉ गौरी पाटील यांनी स्पॉन्सर केलेले होते
कार्यक्रमामध्ये टोणे उखाणा , एक मिनीट काउंटींग उखाणा ,
बॉल पासिंग गेम , घेण्यात आले
संपूर्ण महिलांनी खुप धमाल केली तेसेच सकलं महिला मंडळाच्या अध्यक्षा यांनी महिलांनी आरोग्याची काळजी दैनिक व्यायाम व चालणे ठेवल्याने अगदी व्यवस्थीत ठेवता येते असे सांगितले त्यासाठी आमच्या पुष्पाताई चौधरी या छान उदाहरण आहेत हे ही सांगितले.
सोनल ताईंनी सर्व बक्षीस स्पॉन्सर केली होती आणि कार्यक्रमाचे ठिकाण व व्यवस्था व्यवस्थीत केलेली होती तसेच डॉ गौरी पाटील आणि सौ अश्वीनी नेमाडे यांनी विशेष सहकार्य केले
यशस्वीतेसाठी जिल्हा अध्यक्ष सौ स्वाती भोळे
उपजिल्हा अध्यक्ष सौ नैना जावळे, अध्यक्ष सौ मनीषा पाटील
सौ मेघा कुरकुरे सौ दिप्ती चौधरी सौ सोनल महाजन
सौ अश्वीनी नेमाडे सौ मेघा वाणी , कल्पना शिंदे
सौ वैशाली चौधरी सह संपूर्ण कार्यकारणी मंडळ बहिणाई ब्रिगेड लेवा महिला मंडळ भुसावळ यांनी परिश्रम घेतले .